घरो घरी मातीच्या बैलांची पुजा करून सण साजरा
नागपूर/ग्रामीण समाचार : बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बैलपोळा हा सण श्रावण अमावस्या दिवशी साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरापासून आणि शेतीपासून आराम दिला जातो.
या दिवशी बैलांना उटणे लावून स्वच्छ आंघोळ घातली जाते. बैलांना विविध रंगांच्या वस्त्रांनी आणि दागदागिन्यांनी सजवले जाते. या दिवशी बैलांचे खांडे तुपाने किंवा हळदीने माखले जातात. बैलांना गोड पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो.
बैल पोळ्याचे महत्त्वबैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अंत्यत उत्साहाचा असतो. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा करतात. शेती मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे म्हणून एक दिवस ग्रामीण भागातील नागरिक पोळा साजरा करुन बैलाची पूजा केली जाते