नागपूर समाचार : राज्यस्तर शालेय सॉफ्टबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा सॉफ्टबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे 16 ते 19 या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कुशान जैन, क्रीडा व युवक सेवेचे उपसंचालक शेखर पाटील, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी पियुष अंबुलकर, जिल्हा सॉफ्टबॉल संघटनेचे अध्यक्ष केतन ठवकरे, निवड समिती सदस्य किशोर चौधरी, जिजामाता पुरस्कारार्थी डॉ. दर्शना पंडीत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या स्पर्धेसाठी राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, लातूर, अमरावती व नागपूर या 8 विभागातून 288 खेळाडूनी सहभाग घेतला आहे. निवड चाचणीसाठी राज्यातील 80 खेळाडू स्पर्धेमधून निवड करण्यात येणार असून राज्याचा संघ 19 ऑक्टोबर रोजी निवडण्यात येणार आहे.
अमित प्राथमिक शाळेच्या योगासनाच्या खेळाडूंनी प्रात्यक्षिक मुख्यध्यापक श्री.कडू यांचे मार्गदर्शनाखाली केले तर नुतन भारत विद्यालयाच्या खेळाडूंनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक प्रणय सुखदेवे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी तर सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी अभय महल्ले यांनी केले. उपस्थितांचे आभार तालुका कृषी अधिकारी राजेंद्र साप्ते यांनी मानले.