जास्तीत जास्त संख्येने कार्ड काढण्याचे आवाहन
नागपूर समाचार : वाडी नगरपरिषदेतील वॅार्ड क्रमांक 5 येथे जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी उत्तमराव फड यांचे आयुष्मान कार्ड कसे काढावे याचे मोबाईल ॲपवर प्रात्यक्षिक करून दाखविले.
स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांमध्ये जागरूकता व्हावी यासाठी ई केवायसी करीत आयुष्मान कार्ड काढून दाखविले. जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.