- विराध्या इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ने केली पैसे घेऊन फसवणुक
- राष्ट्रवादी कॉंग्रेस चा हुडकेश्वर् पोलीस स्टेशन चा घेराव
नागपूर समाचार : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस महाराष्ट्र माजी प्रदेश सरचिटणीस नागेश देडमुठे यांच्या नेतृत्वात नागपूर मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकी बाबत हुडकेश्वर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत माने यांचा घेराव करण्यात आला व नागपूर मेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावाखाली पैश्याची फसवणूक करून कोणा कडून 4 लाख तर कोणाकडून 5 लाख , 8 लाख रुपये घेऊन मोठा करोडोंचा घोटाळा करणाऱ्या विराध्या इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या विरोधात निवेदन देण्यात आले व चर्चा करून पीडित युवक व युवतींना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा व कंपनी वर गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून यापुढे नागपूर शहरातील युवक, विद्यार्थी , युवती यांच्या सोबत असले प्रकार घडण्याला आळा बसेल व अश्या फ्रॉड कंपन्या नागपूरातील युवक व विद्यार्थ्यांचे फसवणूक करणार नाहीत.
राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या माध्यमातून मागणी करण्यात आली की , या कंपनी आणि संबंधितावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस हुडकेश्वर पोलीस स्टेशन परिसरात तीव्र आंदोलन करेल व याची सर्वस्व जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असेल.
या प्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस प्रदेश सचिव लक्ष्मीताई सावरकर , राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस मा.प्रदेश सरचिटणीस राहुल कामळे , महिला दक्षिण नागपूर निरीक्षक सिमाताई चारभे , रा.यु.कॉ नागपूर शहर महासचिव तुषार ढबाळे , राहुल इंगळे , सुशील ढोलेकर, राहुल कोल्हें, पंकज कावरे , पुस्पम धानोरकर , आशिष घोडे , अजिंक्य यावले , प्रवीण फुसे , चंदू दांडेकर , नामदेव देशकर , शुभम दांडेकर , सचिन कापसे , नमन जमाइवर , राजू दांडेकर , तुषार गोहाणे , सोमेश्वर दांडेकर , सुरज बांगरे , गोविंदा रोडगे , निलेश रोडे , जांबुवांत शेंबेकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.