नागपूर समाचार : मोरया फाउंडेशनच्या वतीने २१ ऑक्टोबर रोजी, शनिवारी झालेल्या कार्यक्रम एक दिवसीय गरबा दांडिया रास स्पर्धेचे आयोजन विठ्ठलनगर येथे केले होते. या नवरात्रीच्या पावन पर्वावर अंधजोडपं परदेसी याची ओटी मोरया फाउंडेशनच्या संस्थापिका सौ. रजनीताई चौहाण यांनी भरली. तसेच अण्णाजी पत्रीडकर, नारायण कानेर, मोहम्मद जियाउद्धीन शेख यां अंध व्यक्तीना टिका लावून वस्त्र दान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे युवराज जयसिंग मुधोजी राजे भोसले यांनी माल्यार्पण व दीपप्रज्वन केले. अंध गायक मोहम्मद शेख यांनी देवीचे भक्ती गीते गायली. कार्यक्रमात अनेक समूहाने उत्कृष्ट गरबा दांडिया यांचे सादरीकरण केले.
स्पर्धेचे परिक्षक म्हणून नृत्य शिक्षक सोनू नक्षने व सौ. अधिरा गुरनुले यानीं निवडलेल्या गरबा टीम ला, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी नगरसेविका सौ. माधुरीताई ठाकरे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश चौहाण, समाजसेविका सौ.माधुरीताई तलमले, कैलास पोहरे, रतन मोहाडीकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमात मोठया संख्येने विठ्ठलनगरात नागरिकांची उपस्थिती होती. लहान मुलांनी व महिलांनी खूप आनंद घेतला. यावेळी सौ.माधुरी इत्तेडवार, मनीषा भोयर, सुवर्णा रहाटे, फाल्गुनी निमजे, संध्या जैस्वाल, या मोरया फाउंडेशनच्या सदस्यांनी सहकार्य केले तर सौ.रजनीताई चौहाण यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली.