नागपूर समाचार : मौजा हुडकेश्वर (बु) प.ह.37, खसरा क्र.68/69 गणेश धाम हुडकेश्वर(बु) नागपूर या ले आउट धारकाने सहायक संचालक नगर रचना ग्रामीण यांच्या कडून पत्र क्र.स.स.नाग/3152/ दिनांक 16.8.2002 च्या आदेशानुसार मजुरी प्राप्त झाली आहे. या आदेशात नियम क्र ८ मध्ये स्पष्ट पणे सार्वजनिक उपयोगाची जागा 10% आणि सार्वजनिक मोकळी जागा 10% सोडणे बंधनकारक होते.त्या नुसारच ले-आऊटला मंजुरी दिली होती. त्यातच नियम क्र. ३मध्ये सार्वजनिक दोन्ही जागा व रोड इत्यादी विधिवत हस्तांतरित केल्यानंतरच भूखंड विक्री करावयाची होती असे स्पष्ट नमूद आहे. परंतु ते सगळे नियंम बाजूला ठेऊन सोडण्यात आलेल्या सार्वजनिक जमिनी कसे आपल्या ताब्यात घेता येईल ह्याकरिता बिल्डर द्वारे सतत प्रयत्न चालू होते.
दिनांक१४.५.२०१३ पासून हुडकेश्वर – नरसाळा हा भाग नागपूर महापालिकेत विलीन केला गेला. त्यानंतर बिल्डर द्वारे या सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर पक्क्या भिंतीचे काम चालू करण्यात आले त्याला विरोध दर्शवित या वसाहतीतील नागरिक नागपूर महानगर पालिका हनुमान नगर झोन क्र.३ येथे गेले. त्यानंतर झोन क्र. ३ यांनी पोलीस ताफा सोबत घेऊन सार्वजनीक उपयोगाची जागा व सार्वजनिक मोकळी जागा या दोन्ही जागेवर हि जागा नागपूर महानगर पालिकेची आहे असे बोर्ड लावले.त्यानंतर सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर बिल्डर द्वारे सुरक्षा भिंतीला कुलूप लावण्यात आले. पुन्हा परत येथील लोकांनी हनुमान नगर झोन क्र. ३ ला भेट देऊन ते लावलेले कुलूप नागपूर महानगर पालिकेनी काढून लोकांकरिता जागा खुली केली. त्यानंतर पुन्हा नोव्हेंबर २०१९ ला सार्वजनिक उपयोगाच्या सुरक्षा भिंतीला बिल्डर द्वारे कुलूप लावण्यात आले. पुन्हा येथील नागरिकांनी झोन क्र. ३ ला या बाबत माहिती देण्यात आली.
नागपूर महानगर पालिकेनी सार्वजनिक मोकळ्या जागेचा ताबा घेऊन या जागेचा ७/१२ वर नागपूर महानगर पालिकेच्या नावी नोंद दिनांक२०.२.२०२० ला करून घेतली. तसेच दिनांक १.४.२०२१ ला सार्वजनिक उपयोगाची जागेचा ताबा घेऊन त्या जागेच्या ७/१२ वर दिनांक १५.७.२०२२ ला नोंद केली. या नंतर बिल्डर ला नोटीस बजावून आयुक्त मनपा यांच्या निर्देशानुसार दिनांक २३.१०.२०२२ ला मा.श्री गावंडे साहेब उपायक्त नगर रचना मनपा नागपूर तसेच श्री पाराशर साहेब executve engginier स्थावर विभाग मनपा नागपूर तसेच हनुमान नगर झोन क्र. ३ चे engginear श्री आगरकर साहेब आणि श्री पिंपळकर साहेब गणेश धाम वसाहती मध्ये आले.त्यांनी सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर गेटला लावलेला कुलूप गेट सहित काढण्याचे आदेश देत तुरंत गेट काढून येथील नागरिकांना ते खुले करून दिले.
१. गणेशधाम येथील नागरिक मागील 10 वर्षा पासून या सार्वजनिक जागेकरिता सतत संघर्ष करीत होते. या वसाहतीतील नागरिकासाठी सोडण्यात आलेल्या जमिनी करिता बिल्डर श्री विष्णू गोपाल शाहू यांनी पहिली याचिका मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे रिट पिटीशन न.3790/2022 दाखल केले. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडापीठाच्या डबल बेंचचे माननिय न्यायाधीश श्री रोहित बी.देव आणि माननीय न्यायाधीश श्री वाय जी. खोब्रागडे यांनी दिनांक 3.2.2023 ला हि याचिका खारीज केली.
२. यानंतर पुन्हा बिल्डर श्री विष्णू गोपाल शाहु यांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ डबल बेंचचे माननीय न्यायाधीश श्री ए स चांदूरकर आणि माननीय न्यायाधीश श्रीमती वृषाली व्ही जोशी च्या समक्ष रिट पिटीशन न.1787/2023 याचिका दाखील केली. दिनांक 16.8.2002 नुसार या सहाय्यक नगर रचना संचालक ग्रामीण यांचे पत्र क्र.स.स.नाग./3152/ लेआऊट ला अंतिंम मंजुरी दिली होती.
परंतु याचिकाकर्ता यांनी पत्र क्र.स.स.नाग./3273/ दिनांक 29.12.2001 ची बनावटी मंजुरी दाखवून त्यातील अनु क्रमांक 3 मध्ये 10% जागा मुख्यत्वे शाळा, इलेक्ट्रिक सब स्टेशन इत्यादी आरक्षित करण्यात आल्याचे सांगितले आणि त्या सार्वजनिक उपयोगाची जागा गणेश ज्ञानगंगा या शैक्षणिक संस्थेला बक्षीस पत्र करून दिले.
प्रतिवादी क्र.4 गणेशधाम नागरिक समितीचे अध्यक्ष श्री संजय पाटील यांनी पत्र क्र.स.स.नाग./3273/ दिनांक 29.12.2001 चा दस्तावेज हा संपूर्ण खोटा व बनावटी आहे असे सांगितले.दि 29.12.2001 च्या मूळ कागद पत्राची सत्यप्रत कोर्टात सादर केली. त्या सत्यप्रतित शैक्षणिक संस्थेच्या आरक्षणाबाबत कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयांनी जमीन मालकीचा मुद्दा हा वादग्रस्त असल्यामुळे व सरकारी कागदपत्रांमध्ये छेडखाणी झाल्याचे लक्षात आल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने याचिका कर्त्याची याचिका दिनांक 23.10.2023 ला खारीज केली.
हे संपूर्ण प्रकरण प्रतिवादी क्र. 4 गणेशधाम नागरिक समितीच्या वतीने माननीय वकील श्री. निलेश म.गायधने यांनी काम पाहिले.