नागपूर समाचार : विदर्भातील एकमेव महिला नकलाकार आणि नाट्य सिने कलावंत प्रा. डॉ. संगीता टेकाडे यांचा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभाग द्वारा रंगभूमी दिनाचे अवचीत्त साधून रंगभूमी कलावंत म्हणून रघुजी नगर येथील सभागृहात त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रेष्ठ नाट्य कलावंत दिग्दर्शक प्रभाकर दुपारे प्रमुख अतिथी जेष्ठ नाट्य कलावंत सौ. मालती झाडे आणि सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड हे उपस्थित होते.
मान्यवरांनी संगीता टेकाडे यांचे भरभरून कौतुक केले. हाडाचा कलावंत कसा असावा तर ती संगीता टेकाडे हे जिवंत उदाहरण देता येईल. तिच्यात अभिनय हा रक्ता रक्ता मध्ये भरलेला आहे, तिचे विशेष म्हणजे ती सहा ऐतीहासीक पात्र एक स्त्री असून जिवंत हुबेहुब सादर करते ही जमेची बाजू आहे. हे सर्व कलावंतांना जमत नाही. त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस ही सर्व पात्र ती जिवंत उभी करते ही साधारण बाब नाही याला दांडगा अनुभव लागतो कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रतिभा भाकरे यांनी मानले.