नागपुर समाचार : या भिंतीवर एक चित्रफित चिटकवलीय. ती नीट बघा. ही चित्रफित आहे मराठी साहित्य जगतातील पहिल्या ई-दिवाळी अंकाच्या प्रसारणाची. आजवर दिवाळी अंकाचं प्रकाशन होतं आलंय्. आज पहिल्यांदा दिवाळी अंकाचं प्रसारण झालं. याकरिता भारत विकास परिषदेच्या विदर्भ प्रांतानं पुढाकार घेतला. “वसुधैव कुटुम्बकम” या नावानं हा ई-दिवाळी अंक आपल्यापर्यंत विनाशुल्क पोहचेल.
साहित्य विश्वात जगाच्या पाठीवर फक्त मराठीजनांमध्ये दिवाळी अंकाची समृद्ध परंपरा आहे. दिवाळी म्हणजे दीपज्योती, आकाशकंदील, फटाका, दिवाळीचा किल्ला, रांगोळी, फराळ, नरकचतुर्दशीचं अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबिज हे जसं अत्यावश्यक, तसाच दिवाळी अंक ही गरजेचाच. दिवाळी अंक ज्या घरात, तेच मराठी सारस्वताचं घर, असा संकेत आहे. डिजिटल स्वरुपात आम्हाला दिवाळी अंकाची निर्मिती करुन माय मराठीची साधना करता आली, हे आमचं भाग्य.
भाविपच्या विदर्भ प्रांतानं यंदा दिवाळी अंक प्रकाशित केलाय… अंकाचं नाव आहे “वसुधैव कुटुम्बकम्”. या देखण्या ई-दिवाळी अंकाचं प्रकाशन वडिलकीच्या नात्यानं श्री. नितीनजींनी केलं, आणि हा ई-दिवाळी अंक डिजिटल माध्यमात प्रसारित झाला. हा अंक १० लाख मराठी घरात पोहचविण्याची व्यवस्था भारत विकास परिषदेच्या विदर्भ प्रांत चमूनं केली आहे.
या अंकाच्या निर्मितीकरिता मला खारीचा वाटा उचलता आला, याचं समाधान आहे. त्याचबरोबर हा पहिला डिजिटल दिवाळी अंक असा आहे, ज्यात अगदी एकही जाहिरात नाही. संपुर्ण अंकाची निर्मिती इन्-हाऊस केली गेलीय्. अंक वाचनिय आहे. आज भाविपचे विदर्भ प्रांत अध्यक्ष CA संजय गुळकरी, प्रांतमहासचिव प्रा. पद्माकर धानोरकर, प्रांत उपाध्यक्षव्दय सीमा मुनशी आणि दिलीप गुळकरी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा अंक श्री नितीनजींनी डिजिटल स्वरुपात मराठी रसिकांना समर्पित केला. या सोहळ्याची ही ह्रद्य चित्रफित.
आपणास विनंती ही की, या दिवाळी अंकाकरिता भारत विकास परिषदेच्या फेसबुक पेजला भेट द्या. हा दिवाळी अंक या पेजवर उपलब्ध करुन देण्यात आलाय. कमेंटमध्ये आपण आपल्या नावासह वॉटस् एप नंबर नोंदवला, तर हा अंक आपल्याला PDF स्वरुपात वॉटस् एप केला जाईल.