शिबिरात एकूण-२१९ लाभार्थीनी लाभ घेतला
पारशिवनी समाचार : दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी,आमगांव,ता.पारशिवनी येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियान” अंतर्गत अॅड.आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी,मोतिबिंदु तपासणी, मोफत चष्मे वाटप व आयुष्मान भारत निःशुल्क कार्ड शिबिर आमगांव येथील जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आले होते.
महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ पतासणी करण्यात आली. तसेच शिबिरात एकूण-२१९ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-५२, औषधी द्वारे उपचार होणारे लाभार्थीं-१८,व चष्मे करिता- १४९ लाभार्थींनी लाभ घेतला.
या कार्यक्रम प्रसंगी हितेशजी चोले, प्रशांतजी सहारे, चेतन ढोरे, आनंदजी नखाते, दिवाकरजी राजूरकर, संजयजी तांबे, पवनजी सहारे, विष्णूजी सहारे, अक्षयजी राजूरकर,रोशनजी पिंपळामुळे,गौरव पनवेलकर,सुमित कामड़े उपस्थित होते.
आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे. यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि, रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.