नागपूर समाचार : सुनंदा पुरी या प्रोग्रेसिव्ह फेडरेशन ऑफ व्हिजीवली चॅलेंज संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी असून दरवर्षी प्रमाणे यावेळी सुद्धा दिव्यांगांच्या घरोघरी जाऊन फराळ कीट भेट देऊन दिवाळी साजरी केली.
सर्वाना हसवा, पण कधी कुणावर हसू नका, सर्वांच दुःख वाटून घ्या, पण कधी कुणाला दुखवू नका सर्वाच्या वाटेवर दिप लावा, पण कुणाचं हृदय जाळू नका हीच जीवनाची रीत आहे, असे पेराल, तसेच उगवेल. या ओळींचा अनुकरण करत सुनंदा पुरी मॅडम सतन दिव्यांगांसाठी कार्यरत असतात.