नाट्यप्रतिक थिएटरच्या अकॅडमी…
साध्या राज्यात कडकडीत लॉकडाऊन आहे .त्यामुळे घरी राहून अनेकजण वाचन, पाककला, गाणी, असे विविध उपक्रम राबवत आहेत. मात्र यामध्ये काहि असेही आहेत की ज्यांनी घरी राहून कंटाळा आला आहे. अशा लोकांचे घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी , वर्धेतील नाट्यप्रतिक थिएटर अकॅडमी या आगळ्यावेगळ्या उपक्रम सुरू केलेला आहे. प्रत्येकजण काही ना काही उपक्रम या लॉकडाऊनच्या काळात करत आहे, त्याचप्रमाणेच प्रतीक सुर्यवंशी व अंकिता वांधे हेही कलेशी प्रामाणिक राहून हा संकल्प राबवताना दिसत आहेत.
यामध्ये नाटक ,वेब सिरीज ,कथा, कविता, चित्रपट, अशा विविध कलांचे सादरीकरण केले जाते. दररोज संध्याकाळी 7 वाजता , YOUTUBE वर याचे प्रक्षेपण केले जाते. लॉकडाऊन जोपर्यंत असेल तो पर्यंत हे थिएटर चालू राहणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व कलाकार घरी राहून हे काम करत आहेत . नाट्य रसिकांबरोबर अनेक दिग्गजनीं देखील या उपक्रमाचे कौतुक केले आहे .अधिक माहिती साठी आजच संपर्क करा 9764959995 या नंबर वर आणि बघा रोज मनोरंनात्मक कार्यक्रम.