- Breaking News, नागपुर समाचार

हिंगणघाट समाचार : भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिवपदी रवी उपासे यांची नियुक्ती

आ. समीर कुणावार, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचे उपस्थितीत सोपविले नियुक्तीपत्र

हिंगणघाट समाचार : शहरातील भाजपाचे युवा कार्यकर्ते श्री रवी उपासे यांची भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.

विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे स्थानिक जनसंपर्क कार्यालयात आज श्री रवी उपासे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले असून त्यांना पुढील कार्याकरीता ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते तसेच आ.समिर कुणावार यांनी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी आमदार समीर कुणावार,जिल्हा उपाध्यक्ष भाजपा किशोर दिघे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, प्रदेश महामंत्री अनुसूचित जमाती मोर्चा नितीनजी मडावी यांचेसह विधानसभा प्रमुख संजय डेहणे, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, ओबीसी जिल्हाध्यक्ष मंगेश झाडे, भाजपा शहर अध्यक्ष भूषण पिसे , हिंगणघाट तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, समुद्रपूर तालुका अध्यक्ष वामन चंदनखेडे, समुद्रपूर भाजपा शहराध्यक्ष गजानन राऊत, नलिनी सयाम, रवीला आखाडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गवळी, ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष अनिल चापले , ज्येष्ठ पत्रकार माजी नगरसेवक तथा भाजपा जिल्हा चिटणीस किरण वैद्य, समाजसेवक सुनील डोंगरे, अनिता मावळे, महिला ग्रामीण तालुकाध्यक्ष कीर्ती सायंकार, विजया तेलरांधे, माजी नगरसेवक उमेश तुळसकर, देवेंद्र पडोळे, भाजपा आदिवासी जिल्हाध्यक्ष शंकर आत्राम, युवा मोर्चा शहराध्यक्ष सोनू पांडे, कवीश्वर इंगोले, हिंगणघाट नगरपरिषद माजी सभापती सोनू गवळी, विवेक चरडे, अक्षय थुटे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ता गण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *