- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : नृत्‍याविष्‍कारातून सादर झाली नदीची जन्‍मकथा

नागपूर समाचार : उदयोन्‍मुख कलाकारांना प्रोत्‍साहन देण्‍याच्‍या उद्देशाने रविवारपासून स्‍थानिक कलाकारांचे विविध कार्यक्रम सादर केले जाणार असून त्‍या श्रृंखलेतील पहिला कार्यक्रम रविवारी मुख्‍य कार्यक्रमापूर्वी पार पडला. स्‍वरसंगम प्रस्‍तुत किशोर नृत्‍य निकेतनतर्फे प्रसिद्ध भरतनाट्यम गुरू क‍िशोर व किशोरी हम्‍पीहोळी यांच्‍या चमूने ‘गंगा-यमुना’ ही नृत्‍यनाटिका सादर केली.

गंगा, यमुना आणि सरस्‍वती या तीन प्रमुख नद्यांच्‍या त्रिवेणी संगमावर आधारित या नृत्‍यनाटिकेतून नदीच्‍या जन्‍माची कहाणी, जलप्रदूषण व कोरोना काळात लागलेल्‍या लॉकडाऊनमध्‍ये नद्यांची झालेली स्‍वच्‍छता यावर भाष्‍य करणारी कहाणी भरतनाट्यम नृत्‍यनाटिकेच्‍या माध्‍यमातून प्रस्‍तुत करण्‍यात आली.

 

यात ऐश्‍वर्या मोघे, प्राची बारापात्रे, श्रेया जोशी, काजल खिची, कोमल म्हैसबडवे, आधा मोहुर्ले, इंद्रायणी इंदूरकर, कल्‍याणी चिकुलवार, सपना पटेल, भूम‍िका मेंडुले, रुपल मंदावार, रिद्धी इंगे, गौरी भागवत, प्रणाली रसाळ, पृथा राऊत, जान्‍हवी बेतावार, गुढी मोहुर्ले, कामाक्षी हम्पीहोळी व किशोरी हम्‍पीहोळी या कलाकारांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी लालजी श्रीवास, मुकुंद श्रीवास, नकुल श्रीवास, विशाल यादव व अंकिता देशकर-विश्‍वरुपे यांचे सहकार्य लाभले. कांचनताई गडकरी व अपर्णा अम‍ितेश कुमार यांच्‍या हस्‍ते कलाकारांचा सत्‍कार करण्‍यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *