नागपूर समाचार : जनकल्याणासाठीचा संकल्प सोडून आज सकाळच्या प्रहरात वाद्य आणि संगीताच्या साथीने खासदार सांस्कृतिक महोत्सवात ‘जागर भक्तीचा’ अंतर्गत सुंदरकांड पठणाचा कार्यक्रम सुफळ संपन्न झाला.’ जय बजरंग रामायण मंडळ’, पोलीस लाईन टाकळीच्या’ भाविकांनी कर्णमधुर अश्या सुंदरकांड चे प्रभावी सादरीकरण केले. यावेळी सुरवातीला आणि शेवटी बोलो ‘ राम सियाराम, सियाराम जय जय राम ‘ ने परिसर निनादून गेला.
जयप्रकाश गुप्ता यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला संकल्प घेतला आणि त्यांनतर उपस्थित मान्यवरांनीं श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन केले. मंत्रोच्चर आणि एकमुखाने गजर याचे विलक्षण भक्तिमय दृश्य यावेळी बघायला मिळाले.
तत्पूर्वी संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी, साध्वी सूर्यप्रभा, मुन्नाजी छांगाणी, जयप्रकाशजी गुप्ता कार्यक्रमाच्या संयोजिका रंजना गुप्ता, अमृत वक्ता विवेक घळसासी, अरविंद हाडे, संतोष मोदी, दीपक झरगट, मायाताई हाडे, विनोद गुप्ता, प्रमुख संयोजक मुन्नाजी ठाकूर यांचा आदर सत्कार करण्यात आला. याशिवाय अप्रतिम अश्या सादरीकरणासाठी सुंदरकांड पठण करणाऱ्या चमूचा देखील सत्कार खासदार सांस्कृतिक समितीच्या वतीने कार्यक्रमाच्या शेवटी करण्यात आला.
जयप्रकाश गुप्ता यांनी मुन्ना ठाकूर यांचा आदर सत्कार केला, चंद्रशेखर दुबे यांचा सत्कार विवेक घळसासी यांनी केला तर रंजना गुप्ता यांचा सन्मान देखील जयप्रकाश गुप्ता यांनी केला. कार्य्रमाच्या शेवटी हनुमान चालिसाचे पठण,आरती आणि प्रसाद वितरण झाले. रेणुका देशकर यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. हजारो भाविकांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेतला.