- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : डॉ. आंबेडकरांच्‍या जीवनावरील ‘संव‍िधान शिल्पकार’ चा शानदार प्रयोग

खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचा नववा दिवस 

नागपूर समाचार  : भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्‍वपूर्ण प्रसंग, त्‍यांच्‍यावरील गाजलेली गीते, प्रसिद्ध गायक-गायिकांचा लाईव्ह परफॉर्मन्स आणि जोडीला हॉर्स रायडिंग, ढोल ताशा पथक आणि फटाक्यांची विलोभनीय आतशबाजी असे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणा-या ‘संविधान शिल्‍पकार’ या हिंदी महानाट्याचा शानदार प्रयोग शनिवारी सादर करण्‍यात आला. 

खासदार सांस्‍कृत‍िक महोत्‍सवाच्‍या आज नवव्‍या दिवशी भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित हिंदी महानाट्य ‘संव‍िधान शिल्पकार’ सादर करण्‍यात आले. आजच्‍या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचनताई गडकरी, राष्‍ट्रीय अनुसूच‍ित जमातीचे नेते सुभाष पारधी, धर्मपाल मेश्राम, समाज कल्‍याण आयुक्‍त सिद्धार्थ गायकवाड, माजी आ. नागो गाणार, पीआय अन‍िल ताकसांडे, माजी आ. डॉ. मिल‍िंद माने, अरव‍िंद गजभ‍िये, बंटी कुकडे, भैयाजी बिघाने, जानराव गजभ‍िये, संदीप जाधव, उषा पॅलेट, वंदना भगत, अॅड. न‍ितीन तेलगोटे, नानाभाऊ शामकुळे आदी अनेक मान्‍यवरांची उपस्‍थ‍िती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील निवडक महत्त्वपूर्ण प्रसंग जसे की जन्म, बालपण, शिक्षण, विवाह, महाडचा सत्याग्रह, मंदिर प्रवेश सत्याग्रह, येवला येथील सिंहगर्जना, राऊंड टेबल कॉन्फरन्स, भीमा कोरेगाव, पुणे पॅक्ट, रमाबाईचे निधन, महत्त्वपूर्ण राजनैतिक कार्य, दुसरा विवाह, संविधान रचना, धम्मदीक्षा, महाप्रयाण, इत्यादी या संगीतमय महानाट्यात प्रस्‍तुत करण्‍यात आले. 200 कलाकारांचा सहभाग असलेल्‍या या महानाट्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेता अथर्व कर्वे होते. तर सांची जीवने हरीश गवई, आरती क्षीरसागर, मयक अलोने, प्रणय बानाईत, दीक्षा कांबळे, रुपाली कांबळे, र‍ितीका बावने, दिव्‍या गवई, नाना म‍िसाळ, सुनील हमदापुरे, ओंकार काळे, प्र‍ियंका बानाईत, अमन टेंभरे व भीम वादळ टीमचा यात सहभाग होता. 

महानाट्याचे लेखन सुप्रसिद्ध नाटककार व सिनेदिग्दर्शक संजय जीवने यांनी तर दिग्दर्शन सांची जीवने यांनी केले होते. बिगिनर्स एंड अचीवर्स फाउंडेशन प्रस्‍तुत या महानाट्याचे निर्माते कमलजीतसिंह बावा होते. सि‍ने-नाट्य संगीतकार भुपेश सवई यांचे संगीत तर सुमीत राऊत यांचे नृत्य दिग्दर्शन या नाटकाला लाभले. खड्या आवाजाच्‍या कडूबाई खरात व प्रस‍िद्ध युवा रॅपर विपीन तातड (झुंड फेम) ह्यांची लाईव्ह गाण्‍यांमध्‍ये सहभाग होता. 

आजच्‍या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले. महोत्‍सवाच्‍या यशस्‍वीतेसाठी खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्‍दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर यांचे सहकार्य लाभत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *