- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : ‘जयतु जयतु भारतम्’ची दमदार प्रस्‍तुती

नागपूर समाचार : बाल कला अकादमी व स्‍त्री श‍िक्षण प्रसारक मंडळ प्रस्‍तुत ‘जयतु जयतु भारतम’ हा संपूर्ण भारतातील व‍िविध राज्‍यातील लोकनृत्‍यांचे दर्शन घडवणारा कार्यक्रम शाळकरी मुलांनी उत्‍कृष्‍टर‍ित्‍या सादर केला. या कार्यक्रमाची संकल्‍पना सीमा फडणवीस यांची होती तर संवाद लेखन रोशन नंदवंशी व विक्रांत साल्‍पेकर यांचे होते. नृत्‍यदिग्‍दर्शक कुणाल आनंदम व सहनृत्‍यदिग्‍दर्शक कोमल चौधरी – पाल हे होते. बाल कला अकादमीच्‍या अध्‍यक्ष मधुरा गडकरी व स्‍त्री श‍िक्षण प्रसारक मंडळाचे अध्‍यक्ष रवींद्र फडणवीस यांच्‍या मार्गदर्शनात हा कार्यक्रम सादर करण्‍यात आला. उर्वरी डावरे, प्रीती नौकरकर यांचे सहकार्य लाभले. नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सर्व कलाकारांचा सत्‍कार करण्‍यात आला. 

350 बालकलाकारांनी देशातील वैविध्‍यपूर्ण व रंगारंग संस्‍कृतीचे दर्शन या कार्यक्रमातून घडवले. बाल कला अकादमीच्‍या विद्यार्थ्‍यांनी देश रंगीला – रंगीला या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. नारायणा विद्यालयाने जम्मु व काश्मिरचे नृत्‍य, इसेन्‍स इंटरनॅशनल स्‍कूलने ह‍िमाचल प्रदेशातील नेती, सोमलवार रामदासपेठ पंजाबचा भांगडा, अव्हेल स्कूलने हरियाणवी नृत्य, डीपीएस लावाने उत्‍तरप्रदेशातील कथक व तम‍िळनाडूतील भरतनाट्यम, हिंदू मुलींची शाळाने राजस्‍थानातील कालबेलिया व महाराष्‍ट्राची दिंडीवारी, नगर परिषद विद्यालय कळमेश्वरने गुजराती गरबा,

ललिता पब्लिक स्कूलने मध्‍य प्रदेशचे बधाई नृत्य, महिला महाविद्यालयाचे गोवन नृत्य, एसओएसचे छत्‍तीसगडी कर्मा नृत्‍य, द अचिव्हर्स स्कूलने पश्‍च‍िम बंगालचे बाउल नृत्य, अस्पायर इंटरनॅशनल स्कूलने बिहारचे झिझिया नृत्‍य, एसओएस वानाडोंगरीने आसामचे बिहू नृत्य, माउंट लिटेरा झी स्कूल बेसाने ओडिशाचे संबलपुरी लोकनृत्य सादर केले. शेवटी सर्वांनी म‍िळून ‘जयतु- जयतु भारतम’ हे थिम सॉंग सादर केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *