नागपूर समाचार : आदिवासी समाजाच्या विकासासाठी उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल २०१९-२०२० चा आदिवासी सेवक पुरस्कार रमेश उईके याना प्रदान करण्यात आला आहे. दि. २९ नोव्हेंबर २०२३रोजी ठक्करबापा यांच्या जयंती निम्मित नाशिक येथे पारपडलेल्या सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून आदिवासी समाजाच्या विकासासाठी तसेच आदिवासींसाठी क्षेत्रीय बंधन होते ते क्षेत्रीय बंधनाच्या चळवळीत तन-मन धनाने लढा उभारून क्षेत्रीय बंधन हटविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित, आदिवासी विकास आयुक्त ननया गुडे, आदिवासी विकास मुख्य सचिव विजय वाघमारे तसेच आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल न्यू नरसाळा परिसरातील मित्र परिवारा तर्फे रवींद्र गव्हाणे, हेमंत वाभीटकर, नरेंद्र भाजे, सचिन चरडे, किशोर मसराम, सुधाकर कोकर्डे, शशिकांत मडावी, आनंदराव गोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अखिल पवार यांनी हार्दिक अभिनंदन केले