नागपूर समाचार : स्थानिक शिक्षक सहकारी बैंक, महाल नागपुर येथे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्य मोर्चाची कार्यकारणी बैठक स्थानिक शिक्षक सहकारी बैंक सभगृहात भाजपा चे प्रदेशाद्यक्ष चंद्रशेखर बावनकुले यांचे अध्यक्षते खाली सम्पन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांचे हस्ते पार पडले.
प्रमुख उपस्थितीत मोर्चाचे प्रदेश प्रभारी संजय केनेकरजी, माजी आमदार पाशाजी पटेल, माजी आमदार तथा शिक्षक बैंके चे विधमान अध्यक्ष अनिल सोले, माजी आमदार गिरीष व्यास, मोर्चा प्रदेश अध्यक्ष इद्रीस भाई मुल्तानी, राष्ट्रीय ओबीसी सदस्य अतीफ़ रसीद, सर्व महामंत्री, उपाध्यक्ष तथा महाराष्ट्रातून सर्व जिल्हा पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी बावनकुले यांनी मा. पंतप्रधान मोदीजिनच्या नेतृत्वत केंद्र सरकारच्या देशातील अल्पसंख्य समाजा करिता राबविन्यात येणाऱ्या योजनानांबाबत माहिती देत यावर कोणत्याही प्रकारचा पक्षपात न करता सब का साथ सबका विकास या आपल्या मूळ विचारवर भर दिला.
केंद्र सरकार सोबतच आपल्या राज्य सरकार च्या जनकल्याण कारी कार्याची त्यानी विस्तृत मांडणी केली. अल्पसंख्य मोर्चा च्या आपल्या कार्यकर्त्यांनी जमीनी स्तरावर जाऊन कार्य करावे. आपल्या कार्यकर्त्यांनीं समाजाच्या शेवटच्या व्यक्ति पर्यन्त पोहचुन आपल्या पक्षाची भूमिका मांडावी.
मि आपल्या सोबत असून राज्यातील अल्पसंख्य समाजा च्या पाठीशी उभा आहे असे ठोस अभिवचन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर जी बावनकुले यांनी या प्रसंगी दिले.
याप्रसंगी प्रदेश प्रभारी श्री. संजय केनेकरजी, मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री. इद्रीस मुल्तानी यानी सुध्दा आपले विचार मांडले. आपल्या अध्यक्षीय भाषणातुन मोर्चाचे राष्ट्रीय अद्यक्ष श्री. जमाल सिद्दीकी यांनी पक्ष संघटनावर भर देत संबोधन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रदेश मोर्चा महामंत्री जुनेद खान, मोर्चाचे विदर्भ विभागीय प्रमुख रमज़ान अंसारी, मनोज जैन, नागपुर शहर व ग्रामीण अध्यक्ष मोहसिन जफर खान, मोहसिन पटेल, असलम खान, लीडर सरफराज, इरशाद हुसैन ई. अथक प्रयत्न केले