भारत सरकारच्या वतीने आयोजित स्पर्धेत ठरले अजिंक्य
नागपूर समाचार : प्रतिभा आणि प्रतिमा यांची सांगड घातली तर नक्कीच घवघवीत यश मिळत जाते. असाच प्रकार नागपुरातील अथर्व आणि युवीका या दोघांचा संदर्भात घडला. यांनी प्रशिक्षक जय -किशन सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेले धडे कामास आले अन् छत्तीसगडच्या दुर्ग शहरात पार पडलेल्या नाट्य नर्तन “फेस्टिव्हल २०२३” मध्ये दोघे या नृत्य स्पर्धेत अजिंक्य ठरली. त्यांनी सादर केलेले पारम्पारिक नृत्य गाजले आणि स्पर्धेत पहिल्या क्रमांकाच्या तसेच अथर्व याने पहिल्या क्रमाकचे तसेच् अप्रतीम सादरीकरण पारितोषिकास पात्र ठरले.
ऑल इंडिया ड्रामा डान्स, म्यूझिक अॅण्ड फाईन आर्टस् फेस्टिव्हल छत्तीसगडच्या दुर्ग येथे पार पडला. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने कथक रॉकर्स यांनी या नाट्य नर्तन “फेस्टिव्हल २०२३” चे दुर्ग येथे आयोजन केले होते. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत देशभरातून अनेक स्पर्धक सहभागी झाले होते.
त्यात नागपुरातील राहुल पांढये आणि स्वाती पांढये मुलगा अथर्व आणि मुलगी युवीका या दोघांनी प्रतिभा दाखवित सादर केलेले मराठी लावणी नृत्य उपस्थित रसिकांसह परीक्षकांच्या प्रशंसेस पात्र ठरले. यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये सहभागी होत अथर्व आणि युवीका यांनी आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल प्रशिक्षक जय किशन, वडील राहुल पांढये आणि आई स्वाती पांढये तसेच अनेक मान्यवरांनी अथर्व आणि युवीका यांचे अभिनंदन केले आहे.