नागपूर समाचार : अंजली के डबरासे यांच्या बॉलीवूड हंगामा म्यूजिकल ग्रुप अँड इव्हेंट्स, द्वारा प्रस्तुत “आने वाले साल को सलाम” या संगीतमय कार्यक्रमात गायकांनी नव्या जुन्या गीतांची बहारदार प्रस्तुती केली. लक्ष्मी नगर येथील साइंटिफिक हॉल मध्ये नवोदित गायकांनी देखिल सुरेख सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले।
या कार्यक्रमात अहिंसा तिरपुडे यांनी ‘सत्यम शिवम सुंदरम’ हे गाणे अप्रतिम सादर केले. तसेच अंजली डबरासे यांनी मराठी गाणे ‘येऊ कशी प्रिया’ या गीता ने श्रोत्यानना मंत्रमुग्ध केले. यानंतर विनोद दुबे यांनी ‘ऐ गुलबदन’, ‘बंदा परवर’, माधव पटले यांनी ‘दर्द-ए-दिल’, मध्यमा यांनी ‘गजब का है दिन’, धीरज डेलीकर यांनी ‘याद आ रही है’, नंदकिशोर मुळे यांनी ‘लागा चुनरी में दाग’, निकिता बेसरकर यांनी ‘रहे ना रहे हम’, आर्या डबरासे यांनी ‘मुझको हुईं ना खबर’, पवन शर्मा यांनी ‘कितना हसिन चेहरा’, आरोही डबरासे यांनी ‘सून साथीया माहिया’, शेखर समुंद्रे यांनी “दिल तो पागल है”,योगेश पसेरकर यांनी “हर किसीको नही”,अशी विविध रंगी गाण्यांची बरसात या कार्यक्रमात झाली. अतिथी गायक विशाल नाहारकर यांनी “चांद मेरा दिल”,हे गाणे प्रस्तुत केले कार्यक्रमात उपस्थित प्रमुख अतिथी अमर तिरपुडे यांनी “ये वक्त ना खो जाए”, मनीष पाटिल यांनी “जाने जा ढूंढता”,डॉ राजेंद्र पडोळे यांनी ‘सिमटी सी शरमाई सी’, ‘क्या हुआ किस बात’, तसेच सुनीता इंगळे यांनी ‘दिसते मजला सुख’ हे मराठी गाणे सादर केले. केले.
याशिवाय ‘ओ जाना ना जाना’, ‘जीवन के हर मोड पर’, ‘एक हसिना थी’, ‘है अगर दुश्मन’, ‘कितना प्यारा वादा’, ‘दिल तो पागल है’, ‘हमसफर मेरे हमसफर’, आने वाले साल को सलाम,”‘दिवानें है दिवानों को’, आदी गाणे सादर केले।
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव डबरासे , ज्योति द्विवेदी,डॉ. राजेंद्र पडोळे, मनीष पाटील, डॉ. अहिंसा तिरपुडे, अमर तिरपुडे, डॉ. रश्मी तिरपुडे, अस्मिता पोयम, सुनीता इंगळे या मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या आयोजक आणि दिग्दर्शक अंजली के. डबरासे होत्या. तसेच मंच संचालन प्रदीप गौर यांनी केले।