नागपूर समाचार : नागपूर येथे होणाऱ्या जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे 13 14 व 15 जानेवारीला यशवंत स्टेडियमवर 200 कलाकार हे महानाट्य सादर करणार आहे.
यासाठी फिरते रंगमंच तयार होत असून उंट घोडे हे थेट व्यासपीठावर बघायला मिळणार आहे यासाठीचा प्रवेश मोफत आहे मात्र यासाठी प्रवेशिका आवश्यक केलेल्या आहे या संदर्भात वेगवेगळ्या स्तरावर बैठका सुरू आहेत
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उद्या, दि.9 जानेवारी रोजी नागपुरात होत असलेल्या जाणता राजा या महानाट्याच्या तयारीचा सकाळी आढावा घेणार आहेत. संबंधित सर्व अधिकारी या पाहणी दरम्यान उपस्थित राहणार आहेत.
नागपुरात प्रशासनामार्फत 13, 14 व 15 जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार असून या महानाट्यासाठीच्या तयारीला आढावा आज घेतला जाणार आहे. यशवंत स्टेडियम परिसरात महानाट्यासाठी स्टेज, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरागाड्यांची व्यवस्था, साईड पॅनल अशा तयारीला सुरुवात झाली आहे. याची पाहणी जिल्हाधिकारी करणार आहेत.
जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक घेण्यात आली त्यात नियोजनाचा आढावा घेण्यात येऊन संबंधितांना आवश्यक ते निर्देश देण्यात आले त्यावेळी आमदार ॲड. आशिष जयस्वाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांच्यासह संबंधित अंमलबजावणी यंत्रणेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
प्रवेश पासेसची माहिती प्रशासनामार्फत दिली जाणार असून या पासेस कुठे उपलब्ध होतील त्याची माहिती विविध प्रसार माध्यमांद्वारे दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीदरम्यान सांगितले. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना त्या महानाट्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.