- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागपूर येथे कार्यालय कार्यान्वित

विदर्भातील नागरिकांच्या सुविधेसाठी नागपूर येथे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नवीन कार्यालय 

विदर्भातील नागरिकांच्या कामांचा पाठपुरावा होणार

नागपूर- विदर्भवासियांची मुंबईवारी टाळण्यासाठी कार्यालय

नागपुर समाचार  : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नागपूर विभागीय कार्यालय ‘विजयगड बंगला, जिल्हा परिषदेसमोर, रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गातील उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून सचिन यादव हे जबाबदारी सांभाळणार आहेत. 

नागपूर, अमरावती विभागातील नागरिकांची, सामाजिक संस्था, संघटनांची कामे स्थानिक स्तरावरंच मार्गी लागावीत, मुंबईपर्यंत येण्याचे त्यांचे कष्ट थांबावेत या उद्देशाने, अजित पवार यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय कार्यालय सुरु केले आहे. नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याबरोबरंच, मंत्रालयाशी संबंधीत त्यांची कामे तसेच कामांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे.

विदर्भातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याशी संबंधित कामांसाठी नागपूर विभागीय कार्यालयात किंवा उपमुख्यमंत्र्यांचे (वित्त व नियोजन) विशेष कार्य अधिकारी श्री. सचिन यादव यांच्याशी 9421209136 वर संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *