- Breaking News, PRESS CONFERENCE, नागपुर समाचार

नागपुर समाचार : विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना उमेदवारीची हमी द्यावी तरच लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला समर्थन – नारायण बागडे

नागपूर समाचार  : मागिल कित्येक निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेते आणि आंबेडकरी, मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी पुरोगामी विचार सरणी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला भरपूर मतांचे गठ्ठे देऊन सत्तेत सहभागी केले परंतु आंबेडकरी, रिपब्लिकन, कार्यकर्त्यांच्या पदरी निराशाच आली एक दोन रिपब्लिकन नेत्यांच राजकीय पुनर्वसन झाले म्हणजे भरपूर झाले हे समजून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने चुप्पी साधली याच मुळे मागील दोन लोकसभा, विधानसभा निवडणुकीत यांना पराभव स्वीकारावा लागला. रिपब्लिकन पक्षाचे तिन तेरा वाजले असतील पण आज पण आंबेडकरी, फुले, शाहू, विचारांचा समाजाच्या हातात या दोन्ही पक्षाची डोर आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या गटात विखुरलेल्या नेत्यांना समाजाने नाकारले आहे हे तेवढेच खरे आहे याचा अर्थ हे नाही की रिपब्लिकन पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकत्यांना दूर केले आहे समाजाची खरी धुरा समर्थपणे कार्यकर्ते सांभाळत आहेत.

लोकसभा तर नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तरी चळवळीतील मान्यवर सक्रिय कार्यकर्त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने किमान २५ जागेवर तरी उमेदवारी देऊन त्यांच्या उपकाराची परतफेड करण्याची हमी येत्या २६ जानेवारी गणराज्य दिन पंर्यत द्यावी. तेंव्हाच येत्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला राज्यात समर्थन राहिल. असे बागडे यांनी सांगितले.

१४ जानेवारी ला नामांतर दिनानिमित्त भीम सैनिक अस्तित्व अभियान औरंगाबाद (संभाजी नगर) येथून प्रारंभ होणार आहे भीम सैनिकांचे अस्तित्व म्हणजे समाजाचं रक्षण करणे आहे यासाठी सदर अभियान संपूर्ण राज्यात आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा आंबेडकरी विचार मोर्चा आणि पुरोगामी विचार सरणीच्या संघटनेला सोबत घेऊन राबविण्यात येणार आहे असेही बागडे म्हणाले. पत्रपरिषदेत नारायण बागडे, देवेंद्र बागडे, प्रा. रमेश दुपारे, प्रकाश कांबळे, अँड सुरेश घाटे, राजु पांजरे, प्रविण आवळे, हंसराज उरकुडे, दादाराव पाटील, सुभाष बढेल, मधूकर सडमाके, संगिता चंद्रीकापुरे, चरणदास गायकवाड, सुनिता चांदेकर वैशाली तभाने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *