नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील अत्यंत चुरशीच्या लढतीत कारंजा येथील गुरूकुल क्रीडा मंडळाने विजय मिळविला.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे सुरु असेलेल्या स्पर्धेत सोमवारी (ता. 15) उपांत्यपूर्व फेरीतील सामने पार पडले. यात पुरूष गटात गुरूकुल क्रीडा मंडळाचा सामना उमरेड येथील छत्रपती क्रीडा मंडळाशी झाला. या अटितटीच्या सामन्यात गुरूकुल क्रीडा मंडळ संघाने छत्रपती क्रीडा मंडळाला अवघ्या एक गुणाने पराभवाचा धक्का देत विजय मिळविला.
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये चक्रधर नगर येथील श्री गजानन क्रीडा मंडळ संघाने गडचिरोली येथील महाराणा क्रीडा मंडळ संघाविरुद्ध तब्बल 26 गुणांनी एकतर्फी विजय नोंदविला.