नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत हनुमान नगर येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात विदर्भ स्तरीय ज्युडो स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये 19 वर्षाखालील वयोगटामध्ये अमरावतीचा राज नंदवंशी आणि मुलींमध्ये वर्धा येथील शिवानी कापसे यांनी बाजी मारली. राज नंदवंशी याने 66 किलो वरील वजन गटात पहिले स्थान पटकाविले तर शिवानी कापसे हिने 19 वर्षाखालील मुलींमधून 57 किलो वरील वजनगटात पहिला क्रमांक पटकाविला.
मुले आणि मुलींच्या 12 वर्षाखालील, 15 वर्षाखालील आणि 19 वर्षाखालील वयोगटात ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व वयोगटातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पुरस्कारांनी गौरविण्यात आले.