० Digital से physical की तरफ आकर्षित करने के लिए
० बंटी शेळके यांनी पुन्हा दिला रेशिमबाग बचाव चा नारा
नागपूर समाचार : दिनांक 17/01/2024 रोजी सकाळी 6 वाजता नागपूर मा न.पा. चे मा. नगरसेवक बंटी बाबा शेळके यांच्या मार्गदर्शनात मिनी मॅरेथॉन रेस चे आयोजन करण्यात आले आहे. मिनी मॅरेथॉन रेस ची सुरुवत रेशिमबाग मैदान-सी पी अँड बेरार चौक – कोतवाली पोलीस स्टेशन चौक- शिवाजी महाराज पुतळा- अग्रसेन चौक- मेयो हॉस्पिटल -कस्तुरचंद पार्क चौक- संविधान चौक- झिरो माइल चौक-कॉटन मार्केट चौक -गणेश पेठ पोलीस स्टेशन- अशोक चौक ते समाप्ती रेशिमबाग मैदान येथ पर्यंत आहे.
मिनी मॅरेथॉन रेस ठेवण्याचे दोन महत्त्वाची कारणे बंटी बाबा शेळके यांनी सांगितली की, सर्वात महत्त्वाचे म्हणजे लहान मुलांना मैदानी खेळाचे महत्त्व समजावण्या करीता, त्यांना मोबाईल, गेमिंग, टीव्ही, व्हिडिओ गेम, यांच्या जाळ्यातून बाहेर काढण्या करीता. आणि मैदानी खेळ त्यांच्या येणाऱ्या भविष्यात कसे उपयुक्त व महत्वाचे आहे हे समजवण्या करीता बंटी बाबा शेळके यांनी या रेस चे आयोजन केले आहे. आणि दुसरे म्हणजे रेशिमबाग बचाव या मागणीला पुन्हा उचलून धरण्या करीता बंटी बाबा शेळके यांनी या रेसचे आयोजन केले आहे.
कारण काही दिवसा पहलेच जेव्हा संपूर्ण रेशीमबाग मैदान हे एक बाबा करीता अधिग्रहित करण्यात आले होते व हजारो गोरगरीब , धावपटू पोलिस भरती, सैन्य दल भरती, स्पर्धा परीक्षा फिसिकल ची मैदानी प्रशिक्षण येथे घेत असतात. आणि या मैदाना ने हजारो गोरगरीब युवकांना पोलिस प्रशासाना मध्ये , सैन्य दल मध्ये, इतर शासकीय विभागांमध्ये जॉब मिळण्याकरिता महत्त्वाचा वाटा उचलला आहे. परंतु वारंवार या मैदानाचा उपयोग सर्कस, अग्रो व्हिजन, प्रदर्शिनी,बाबा लोकांचं प्रवचना करीता करून लाखो युवकांचे भविष्य टांगणीला लावले आहे. त्या करीता बंटी बाबा शेळके यांनी या मिनी मॅरेथॉन रेस चे आयोजन केले आहे.
या रेस मध्ये धावपटूंना मुलांची वेगळी, आणि मुलींची वेगळी असे 12 वर्ष पेक्षा कमी, 16 वर्ष पेक्षा कमी, आणि 16 पेक्षा जास्त असे सहा विभागात विभाजित केले आहे.
आणि त्याच प्रमाणे त्याचे पारितोषिक सुद्धा सहा विभागात देण्या येणार आहे. प्रथम पारितोषिक 10,000, द्वितीय 7000, तृतीय 5000 असे ऐकून 1,19,200 पारितोषिक व सोबत प्रत्येक विजेत्यास मेडल, शील्ड देण्यात येणार आहे. आणि प्रत्येक सहभागी धावपटू ला भारत न्याय दौड सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.