नागपूर समाचार : Progressive Faderation of Viseeally Challenge अंतर्गत आज दिनांक 16/01/2024 रोजी उत्कर्ष परमेडीकल इंस्टिट्यूट येथे हळदी कुंकवाचा लुईस ब्रेल जयंतीचा तसेच श्री. रामलला यांचा आगमना निमित्त कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमात दिव्यांग बंधु भगिणी उपस्थित होते. अनेक अल्पवयीन स्त्रिया कोरोना काळात विधवा झाल्या त्यांना देखील सौभाग्याचं लेणीचा अधिकार आहे त्यांनाही या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले.
महिलांनी स्वागतगीत, उखाणे आणि गाणी म्हटली. तसेच लकी ड्रॉ मध्ये साडी गिफ्ट म्हणून देण्यात आली. अश्याप्रकारे हा कार्यक्रम हर्ष उल्हासाने पार पडला.
सौ. सुनंदा मोकासरे, सौ. मिनाक्षी बाराघने, सौ. सुमन बोरडे सौ. छाया लोखंडे, दिव्यांगांच्या सामाजीक कार्यकर्ता सुनंदा पुरी, सौ. जोत्सना कामले, सौ. वैशाली खेडकर या कार्यक्रमाला इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थीत होते.