नागपूर समाचार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सहाव्या खासदार क्रीडा महोत्सवा अंतर्गत मल्लखांब स्पर्धेमध्ये संस्कृती गाडवे, गिरीश सोनकुसरे आणि अथर्व बडिये यांनी प्रत्येकी दुहेरी जेतेपद पटकाविण्याची कामगिरी केली.
नूतन भारत अभ्यंकर नगर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 16 वर्षावरील वयोगटात रोप मल्लखांब आणि पोल मल्लखांब या प्रकारात संस्कृती गाडवे हिने प्रथम स्थान प्राप्त केले. रोप मल्लखांबमध्ये संस्कृतीने 8 गुण तर पोल मल्लखांबमध्ये 6.80 गुणांसह बाजी मारली.
16 वर्षावरील वयोगटात गिरीश सोनकुसरेने रोप मल्लखांबमध्ये 7 गुण आणि हँगिंग मल्लखांबमध्ये 5.06 गुणांसह पहिले स्थान पटकाविले. 18 वर्षाखालील वयोगटामध्ये हँगिंग आणि रोप मल्लखांब प्रकारात अथर्व बडिये ने 6.33 आणि 6.95 गुणांसह विजेतेपद पटकाविले.