- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सव 2024; विविध स्पर्धांमध्ये दिव्यांगांनी दाखविले कौशल्य

क्रिकेटमध्ये नागपूर-बी संघाचा विजय

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरामध्ये सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात विविध स्पर्धांमध्ये दिव्यांग मुले व मुलींनी आपले कौशल्य दाखविले. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात गुरूवारी (ता.18) विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

खुल्या वयोगटात झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये नागपूर-बी संघाने ज्ञानज्योती संघाला पराभवाचा धक्का देत विजय मिळविला. नागपूर-बी संघाचा करण सामनावीर ठरला. तर ज्ञानज्योती संघाच्या परमेश्वरला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरविण्यात आले. नागपूर संघाचा योगेश उत्कृष्ट फलंदाज तर प्रणय नांदुरकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला.

मतिमंद प्रवर्गात झालेल्या 15 वर्षाखालील मुले व मुलींची मॅरेथॉन पार पडली. यात मुलांच्या 2 किमी शर्यतीत बाबु (एकवीरा), विजयकुमार (एकवीरा), शोएब शेख (जीवनधारा) यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला तर रवी (एकवीरा) आणि संदेश वाघे (एकवीरा) यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुलींच्या 1 किमी अंतराच्या शर्यतीत सारीका गावंडे (प्रेरणा), पुनम खोटेले (सेवायोग), टिना तानवे (सेवायोग) यांनी पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला. उल्का लांडगे (जीवनधारा) आणि गायत्री मोरे (प्रेरणा) यांना प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आला.

ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानात दिव्यांगांच्या मतिमंद आणि अंध प्रवर्गामध्ये मॅरेथॉन, कॅरम, 100 मीटर दौड, बुद्धिबळ आदी स्पर्धा देखील घेण्यात आल्या. सर्व स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना रोख पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *