नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवातील कुस्ती स्पर्धेमध्ये मुलींच्या 49 किलो वजनगटात यवतमाळची रेणू पवार आणि मुलींच्या 50 किलो वजनगटात अकोल्याचा आर्यन सरदार यांनी विजय मिळविला.
झिंगाबाई टाकळी येथील श्रीराम मंदिर, राठी लेआउट, झेंडा चौक येथे सुरू असलेल्या स्पर्धेत गुरूवारी (ता.18) मुलींच्या 49 किलो वजनगटात नागपूर ग्रामिणची कुस्तीपटू कनक भागदेला दुस-या तर नागपूर ग्रामिणची आरती वाडीवे हिला तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. मुलांच्या 50 किलो वजन गटात वाशिम येथील गणेश डुबे दुसरा आणि भंडारा येथील रजत अनिल झंझाड तिस-या स्थानी राहिला.
अन्य सामन्यांमध्ये मुलींच्या 33 किलो वजन गटात नागपूर ग्रामीणची राणी रामदास निकुळे पहिली, यवतमाळची पोर्णिमा धम्मपाल शेजुळे दुसरी आणि चंद्रपूरची कृतिका सुपेका उपरकार तिसरी ठरली. 36 किलो वजन गटात भंडा-याची ऐश्वर्या शिंगाडे, 40 किलो वजनगटात नागपूर ग्रामिणची अश्विनी बावणे, 43 किलो वजनगटात भंडा-याची प्रणाली झंझाड, 46 किलो वजनगटात नागपूरची प्रांजल खोब्रागडे या कुस्तीपटूंनी पहिले स्थान प्राप्त केले.
मुलांच्या 35 किलो वजनगटात नागपूरचा कुणाल माहुले, 40 किलो वजनगटात भंडा-याचा सुमित झंझाड आणि 45 किलो वजनगटात चंद्रपूरचा भावेश बनसोड या कुस्तीपटूंनी पहिले स्थान पटकाविले.