- Breaking News, खासदार क्रीड़ा महोत्सव, नागपुर समाचार

नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सव  2024; विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवगर्जना, विक्रांत, सप्तरंगची विजयी सुरूवात 

नागपूर् समाचार : खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेतील ज्यूनिअर्स पुरूषांच्या पहिल्या फेरीतील सामने गुरूवारी (ता.18) पार पडले. या स्पर्धेमध्ये रामटेक येथील शिवगर्जना क्रीडा मंडळ, नागपूरातील विक्रांत क्रीडा मंडळ आणि सप्तरंग क्रीडा मंडळाने विजयी सुरूवात केली.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे ही स्पर्धा सुरू आहे. गुरूवारच्या ज्यूनिअर्स पुरूषांच्या पहिल्या फेरीत शिवगर्जना रामटेक संघाने नागपूर व्यायाम शाळा संघाचा 45-24 असा तब्बल 21 गुणांनी एकतर्फी पराभव करीत दमदार सुरूवात केली. अन्य सामन्यांमध्ये विक्रांत क्रीडा मंडळ नागपूर संघाने पारडी येथील महाकाय क्रीडा मंडळाचा 41-13 असा 28 गुणांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. नागपुरातील सप्तरंग क्रीडा मंडळाने लखनपूर येथील आदिवासी क्रीडा मंडळाला 18 (34-16) गुणांनी मात दिली. एकलव्‍य क्रीडा मंडळ नागपूर संघाने चुरशीच्या लढतीत रामटेकच्या साईराम क्रीडा मंडळाला 38-30 असा गुणांनी पराभवाचा धक्का दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *