नागपूर समाचार : खासदार क्रीडा महोत्सवातील पंजा कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात विशाल दुतोंडे, दिशांत नायक आणि आशिष पटले यांनी प्रतिस्पर्धकांना पराभूत करीत विजयी सलामी दिली.
गुरूवारी (ता.18) बुधवार बाजार चौक महाल येथे स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला राजे मुधोजी भोसले, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, सुधीर (बंडू) राउत, स्पर्धेचे कन्वेनर सचिन माथने, संयोजक श्रीकांत आगलावे, क्रीडा शिक्षक अरुण कपुरे, संघटनेचे प्रमाद वालमांडरे, श्रीकांत वरणकर आदी उपस्थित होते.