नागपुर समाचार : शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक श्री. नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता.१९) विविध खेळांना भेट देउन खेळाडूंना प्रोत्साहित केले. ना. श्री. नितीन गडकरी यांनी मोतीबाग येथील दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मैदानातील फुटबॉल सामन्याला भेट दिली.
त्यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ देखील केला व सामन्यापूर्वी खेळाडूंशी हस्तांदोलन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार डॉ. मिलींद माने, स्पर्धेचे कन्वेनर नवनीत सिंग तुली, समन्वयक अशफाक पटेल, संघटनेचे हरीश व्होरा, इकबाल काश्मीरी, क्रीडा शिक्षक रमेश मंडल, राहुल बांते आदी उपस्थित होते.