नागपूर समाचार : शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातंर्गत श्री राम मंदिर राठी लेआउट झेंडा चौक झिंगाबाई टाकळी येथे सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेला शुक्रवारी (ता.१९) खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी भेट दिली.
यावेळी खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक कुस्ती संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर श्री. संदीप जोशी, आशिष मुकीम, माजी नगरसेवक श्री. भूषण शिंगणे, माजी नगरसेविका अर्चना पाठक, संगीता गि-हे आदी उपस्थित होते. यावेळी ना. श्री. नितीन गडकरी यांनी कुस्तीपटूंना शुभेच्छा दिल्या व त्यांना प्रोत्साहित केले.