भव्य शोभायात्रेत वस्तीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर समाचार : दक्षिण नागपूर येथील श्री हनुमान मंदिर पंच कमिटी शिवशक्ती नगर नं. २ व ३ येथील नागरिक व समस्त रामभक्त
च्यावतीने रविवारी 21 तारखेला काकड आरती, हनुमान चालीसा, त्यानंतर हवन संपवून कलश यात्रेला सुरुवात झाली. दुपारी ३ वाजतापासून शोभायात्रेच्या प्रारंभी पालखी, प्रभू श्रीरामचंद्र, माता सीता, लक्ष्मण व रामभक्त हनुमानजी, विठ्ठल, रुक्मिणी चा सहभाग होता.
याप्रसंगी वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी व गाडगे महाराज, छबरी तसेच इतरही वेशभूषेत होते. शोभायात्रेतप्रसंगी मोठ्या संख्येने भक्त गण सहभागी होऊन वस्तीतील वाजत गाजत, नाचत गाजत, जय श्रीरामचे नारे लावत ही शोभायात्रा मंदिरात परत आली.
रविवारी निघालेल्या शोभायात्रा सोहळ्यात सर्व रामभक्तानी सहभाग घेऊन शोभायात्रेला उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला. हरिपाठ करून सुंदरकांड या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.
सोमवार दि. 22 जानेवारी 2024 रोजी, अयोध्येत होत असलेल्या प्राणप्रतिष्च्या अनुषंगाने त्यांच दिवशी व त्याच वेळेस भगवान प्रभु श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असून श्री विठ्ठल रुख्मीनीची सुद्धा स्थापना करण्यात येत आहे. संगमरवरी व तेजस्वी मुर्त्या आणण्यात आल्या असून दुसऱ्या दिवशी सोमवारी 22 जानेवारीला सकाळी 5:45 वाजता. काकडा आरती दुपारी 12 वाजता: प्राणप्रतिष्ठा (अयोध्येतील वेळेच्या मुहूर्तावर) दुपारी 3 वाजता. गोपाळ काल्याचे किर्तन, ह.भ.प. किसनाजी महाराज (भाकरे महाराज याचे शिष्य) तसेच सायंकाळी ७ वाजता. महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.