- Breaking News, नागपुर समाचार

नागपूर समाचार : महानगरात 22 ते 25 जानेवारीपर्यंत “रमाई घरकुल” योजना झोननिहाय शिबीर

नागपूर  समाचार : महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी 22 ते 25 जानेवारी या कालावधीत रमाई घरकुल योजना शिबीराचे आयोजन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व महानगर पालिका नागूपर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या योजनेचे महानगर पालिकेच्या प्रत्येक झोनमध्ये शिबीर आयोजित करण्यात आले आहे. योजना अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील व्यक्तींसाठी असून या योजनेच्या अटी व शर्ती पुढीलप्रमाणे राहतील.

अर्जदार अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र व उत्पन्नाचे प्रमाणपत्र (कुटुंबाचे कमाल उत्पन्न 3 लाख रुपये), स्वमालकीचे जमिनीचे पुरावे व टॅक्स पावती जोडावी. अर्जदाराचे स्वमालकीचे झोपडे किंवा खाली जमीन असावी.कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ देण्यात येईल.

प्राधान्यक्षेत्र : विधवा, पुरग्रस्त, भूकंपग्रस्त, जातीचे दंगलीमध्ये घराचे नुकसान झालेले, ॲट्रासिटी अंतर्गत पीडित अनुसूचित जातीची व्यक्ती यांना प्राधान्य राहील.

योजनेचा लाभ महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन समाजकल्याण आयुक्त व महानगर पालिकेद्वारे करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *