नागपूर समाचार : ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ मध्ये चांगल्या चर्चा झाल्या, उत्पादने प्रदर्शित झाली, सुंदर स्टार्टअप बघायला मिळाले, अनेक सामंजस्य करार झाले. विदर्भाचे औद्योगिकरण व्हावे, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक यावी याकरीता आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव मैलाचा दगड ठरलेला आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. या महोत्सवामुळे विदर्भाची उद्योग क्षेत्रातील जमेची बाजू बाहेरच्या लोकांना लक्षात आली असून विद्यार्थ्यांना दृष्टी देणारा हा महोत्सव ठरला आहे. पहिल्याच वर्षी झालेल्या या यशस्वी आयोजनामुळे भविष्यात ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ रोजगार निर्मितीचे मोठे व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Related Posts
