आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि. २९ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रातील धोची येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळा आज दि. २९ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने गजानन कोसरे, नामदेव बावणे ,अतुल कोल्हे, गजानन दाते, वीरेंद्र बावणे, मारोती बावणे ,सुभाष बावणे, दिगंबर गाढवे, विशाल बावणे, विलास पढाल ,दीपक भोयर, किसना दाते, उत्तमराव बावणे, दामू उमाटे, प्रवीण निशाने, धनराज भुजाडे, गौरव बावणे, जनार्धन बावणे ,अमोल मोहजे ,आशा कोल्हे, रंजना पढाल, संगीता सोनटक्के , सुरेखा बावणे, रत्नमाला भोयर, अंजली बावणे , लताताई कोसरे, संजय भेदूरकर, नगाजी उघडे इत्यादी कार्यकर्त्यांना रितसर भाजपात प्रवेश देण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
उपरोक्त कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह हिंगणघाट तालुका भाजपा अध्यक्ष विनोद विटाळे, अनुलोमचे प्रवीण पोहणे, विशाल मुटे , समाजसेवक सुनील डोंगरे, अमोल खंदार , माजी नगरसेवक देवा पडोळे, अमोल त्रिपाठी संदेश ससाणे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.