नागपूर समाचार : दिनांक 4 फेब्रुवारी ला मराठा सेवा संघ त्रिमूर्ती नगर नागपूर येथे संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर तर्फे शेकडो कार्यकर्त्यांच्या जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेड नागपूर महानगरचे अध्यक्ष शिवश्री प्रताप पटले हे अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री विदर्भवादी नेते डाॅ.रमेश गजबे, जिजाऊ ब्रिगेड च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा शिवमती जया देशमुख, जिजाऊ ब्रिगेड नागपूर जिल्हाध्यक्षा शिवमती स्वाती शेंडे, शिवश्री अमोल हाडके प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच यावेळी संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर वाहतूक आघाडीची घोषणा करण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेड मध्ये स्वेच्छेने आणि वैचारिक दृष्टी लक्षात घेऊन सामूहिक पक्षप्रवेश करून संभाजी ब्रिगेड साठी काम करण्याचे जाहीर केले.
यावेळी शिवश्री प्रताप पटले यांनी निवडणूकीत प्रत्यक्ष सहभाग घेण्याचे घोषणा केली. तसेच शिवश्री रमेश गजबे, शिवश्री अमोल हाडके आणि शिवश्री रवी जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पंकज वानखेडे, अभिलाष बेंदले, महेश तुरकर यांचे मोलाचे योगदान लाभले यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर सामूहिक पक्ष प्रवेश घेतला. संचालन संदीप पोटपिटे यांनी केले तर आभार शिवमती वैशाली नगरारे यांनी मानले.