नागपूर समाचार : नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात २८ जानेवारी रोजी गोंडवाना विकास मंडळ नागपूर येथे स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातून ९ जिल्हयातील ३७८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता, प्रामुख्याने जिल्हे नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, हिंगोली, ठाणे, जळगाव, सातारा, पुणे येथील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
स्पर्धेचे आयोजन पारीतोषीक समारंभाचे प्रमुख पाहुणे नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे विलास करांगळे, जिल्हा नागपूर नियोजन समितीचे उपाध्यक्ष अनिल अहिरकर, प्रिन्सीपल श्रीमती प्रिया रोंघे, इश इन्टरनॅशनल स्कूल बेसा नागपूर यांच्या शुभहस्ते सर्व विजेतांना ट्रॉफी व सर्टीफीकेट देऊन त्यांचा उत्साह वाढवून मनोबल वाढविले.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अँबॅकस असोसिएशन तर्फे उमेश महाजन (जळगाव), शुभांगी हेडाऊ (नागपूर), शिफा अतार (सातारा) यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन अभिजीत मुळे यांनी तर आभार प्रदर्शन शिफा अतार (सातारा) यांनी मानले.