नागपूर समाचार : भारत विकास परिषद विदर्भ प्रान्तातर्फे घेण्यात आलेले मानस सम्मेलन सीताराम भवन रामनगर येथे उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राष्ट्रीय संघटन मंत्री मा. श्री सुरेश जैन तर प्रमुख वक्ता म्हणून डॉ सौ अमिता पत्की, अखिल भारतीय महिला प्रमुख , स्वदेशी जागरण मंच यांची उपस्थिती होती. विशेष अतिथी म्हणुन भारत विकास परिषदेचे क्षेत्रीय सचिव मा. गिरीश दोशी तर विशेष आमंत्रित पद मा. शुभांगी मेंढे, समाजसेविका यांनी भुषविले.
मा. अमिताताईंनी आपल्या खुमासदार शैलीत संस्कृती, स्वदेश, पर्यावरण, समरसता व नागरी कर्तव्य या पाच मुद्यांवर स्वस्थ समर्थ संस्कारित भारत यासाठी सामान्य व्यक्तीचे योगदान हा विषयी गोष्टीस्वरूपात सहज पोहचवला.
मा. सुरेशजींनी भारत विकास परिषदेच्या पंचसुत्रीचे सखोल विवेचन करत परिषदेची कार्यशैली सांगितली.
मा. सौ शुभांगी मेंढे यांनी अनेक संत साहित्यांचे दाखले देत संस्कार विषय समजावला व त्याचबरोबर संस्थाकडून अपेक्षा व्यक्त केल्या.
प्रस्तावना विदर्भ प्रान्त अध्यक्ष मा. संजय गुळकरी यांनी तर अशा सम्मेलनाचे महत्व यावर सम्मेलन संयोजिका व क्षेत्रिय सचिव महिला व बालविकास मा. सौ निलीमा बावने यांनी विषद केले.
अनेक रौप्य व सुवर्ण पदाची मानकरी कु. ईश्वरी पांडे ह्या अंध विद्यार्थीनीने नुकताच अरबी समुद्र पोहून एशियन बुक रेकॉर्ड केला त्याबद्दल तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात क्षेत्रिय सचिव सेवा मा. श्री चंद्रशेखर घुशे, विदर्भ प्रान्त सचिव मा. श्री पद्माकर धानोरकर, वित्त सचिव मा. सचिन धन्नावत तसेच प्रांत पदाधिकारी,सर्व शाखा पदाधिकारी, सदस्य, तसेच अनेक संस्था पदाधिकारी व समाजातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन सहसंयोजिका व प्रान्त महिला प्रमुख मा. सौ छाया शुक्ला यांनी तर आभारप्रदर्शन प्रांत सचिव मा. पद्माकर धानोरकर यांनी केले.
द्वितीय सत्रात २०२४-२५ साठी विदर्भ प्रान्त कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. मा. श्री पद्माकर धानोरकर यांची अध्यक्षपदी, मा. सौ सीमा सतीश मुनशी यांची सचिवपदी तर मा. श्री दिलीप गुळकरी यांची वित्तसचिव पदी सर्वसम्मतीने निवड झाली. मावळते अध्यक्ष श्री संजय गुळकरी व वित्तसचिव मा. श्री सचिन धन्नावत यांनी सर्व शाखा व क्षेत्रिय पदाधिका-यांसह नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या . या प्रक्रियेसाठी क्षेत्रिय सचिव मा. श्री गिरीश दौशी यांनी निवडणुक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली.