नागपूर समाचार : वने, सांस्कृतिक कार्य ,मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज देवलापार येथील गो-विज्ञान अनुसंधान केंद्रास भेट दिली.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील विविध विकास कामे व उपक्रमांच्या उद्घाटनानंतर श्री मुनगंटीवार यांनी सायंकाळी गो-विज्ञान अनुसंधान केंद्रास भेट दिली. ॲड. आशिष जयस्वाल,गो-विज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता, मुख्याधिकारी डॉ मनोज तत्ववादी, कोषाध्यक्ष हितेंद्र चोपकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता विश्वास, नागपूर वन वृत्ताच्या वनसंरक्षक श्री लक्ष्मी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार यांनी येथील कामधेनु पंचगव्य आयुर्वेद भवनाची पाहणी केली. येथील अवलेह विभाग, वटी विभाग, तेल विभाग, इंधन विभाग, सिरप विभाग, प्रयोगशाळा आदींना भेट दिली. येथे निर्माण होणारे फलघृत, हिंग्वाद्यघृत, अष्टमंगलघृत, गोमुत्र अर्क, दंतमंजन आदी 30 पेक्षा जास्त उत्पादनांची माहितीही त्यांनी घेतली. यावेळी अनुसंधान केंद्राच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन श्री. मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी, या आयुर्वेद भवनाच्या परिसरात श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.