नागपुर समाचार : नवनियुक्त पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर रवींद्र सिंगलजी यांचे, नागपूर नगरीमध्ये “कमिशनर ऑफ पोलीस” पदग्रहण निमित्य, “अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद” च्या नागपूर आणि विदर्भ कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून तसेच, नागपूरातील युवा व ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने, “स्वागत पत्र” देऊन गौरवण्यात आले.
“सद्रक्षणाय खलनिग्रणाय” या महाराष्ट्र पोलिसांच्या ब्रीदवाक्य प्रमाणे, समाजातील दुष्ट प्रवृत्ती व्यक्तींना ओळखून, त्यांना साम-दाम-दंड-भेद या चार कोन नीतीने चांगले नागरिक घडवण्याचा सतत प्रयत्न तथा, सद-नागरिकांचे रक्षण करण्याचे, मानव समाजासाठी महान ईश्वरीय कार्य पोलिसांच्या अग्रस्थानी राहुन, आपण करीत आहात….या शब्दात ग्राहक संघटनेतर्फे गौरवण्यात आले.
याप्रसंगी अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे विदर्भ कार्याध्यक्ष श्री मिलिंद जी खेकाळे, नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सौरभजी शुक्ला, विदर्भ क्षेत्र कार्यकर्ता दिलीपजी डहाके श्री संदीपजी आठवले, श्री नायर, श्री गुप्ता, श्री संदेशजी झोपट इत्यादी उत्साही कार्यकर्ते उस्फुर्ततेने उपस्थित होते.