नागपूर समाचार : शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जयंती साजरी करण्यात आली. महाकाली नगर चौकात माँ जिजाऊ डेअरी आणि शिवशक्ती नगर नं. 2 च्या वतीने शिवजयंतीनिमित्त प्राचीन शिवकालीन ऐतिहासिक शौर्य कलेचे प्रात्यक्षिक प्रदर्शित करण्यात आले.
याप्रसंगी प्रशिक्षक विकास हिंगे, जिजामाता डेअरीचे संचालक किशोरजी पवार, शाहू पवार, चंदाताई पवार, प्रदीप गणोरकर, मेघाताई गणोरकर, गजानन शेळके, अमोल पुसदकर, बाबाराव तायडे, साक्षीताई हिंगे, प्रिती गणोरकर, ज्योती गायकवाड, रोशनी फुले, संचिता बेसरवार, दीपक खेडकर, मामा राऊत, सतीश चौधरी, किशोर बुराडे, सुरेंद्र कांदे, गजूभाऊ गायकवाड, लविश बिनवाले, दिवाकर वरुडकर, स्वप्नील सिरसाम, गोतमारे काकजी आणि देवराव प्रधान आदींनी या सोहळा कार्यक्रमात सहभागी झाले होते.