आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा कार्यकर्ते तसेच महीला आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
काल दि. २३ रोजी हिंगणघाट तालुक्यातील चिंचोली येथील बहुसंख्य महिला व युवा कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. २३ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने संजय तुराळे, सुरज कुराळे, प्रमोद तुराळे ,अंकुश टेंभेकर , श्रीकांत वाघमारे, वंदना घोडे ,केशव वाघमारे, संदीप क्षीरसागर , राजीव तुराळे, देविदास फाटे, संतोष कुंभारे, विनोद लोंढे, शंकर मिटकर, विनोद सोनटक्के ,महेंद्र तुराळे, रामाजी मेश्राम, शंकर थाटे, अमित कुराळे, शंकर उघडे, दिलीप ठाकरे, रणजीत मेश्राम, अक्षय तूराळे ,राजू पेटकर, सिताराम मिटकर, ज्ञानेश्वर मिटकर, संभा मिटकर ,वंदना ताई घोडे, सुमन सोनटक्के, विमल राऊत, धनराज सोनटक्के, दिलीप सोनटक्के, प्रल्हाद दांडगे, रामदासजी भोयर, हनुमान दांडगे, लक्ष्मी भोयर, गुणवंत मोहितकर, साहेबराव सोनटक्के, बालाजी इखार ईत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला.. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह महामंत्री आकाश पोहाणे, हिंगणघाट ग्रामीण भाजपा तालुकाध्यक्ष विनोद विटाळे ,आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष शंकर आश्रम, हिंगणघाट शहर प्रमुख भाजपा संजय माडे, माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश भाऊ फुसे , माजी जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट चे संचालक प्रफुल बाडे , फटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष प्रल्हाद दांडगे, भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष गजानन चिडे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.