आ. समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला
हिंगणघाट समाचार : हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा कार्यकर्ते तसेच महीला आ. समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दिनांक २४ रोजी हिंगणघाट तालुक्यातील टेंभा येथील बहुसंख्य युवा कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.
सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दिनांक २४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने चंद्रकांत हुलके, हनुमान चंदनखेडे, प्रभाकर हुलके, नरेश थुल, निळकंठ वांढरे, विलास वाघमारे, रणजीत गराड, धनराज कामडी, विनोद वरभे, भास्कर चंदनखेडे, बाबाराव कामडी, वैभव कामडी, सुरज नेहारे, गजानन हुलके, महादेव बावणे, केशव चांभारे, निलेश कुंमरे, रामभाऊ चाफले, होमराज चाफले, सुनील आत्राम ईत्यादी कार्यकर्त्यांना भाजपात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे वेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोरभाऊ दिघे, जिल्हा महामंत्री भाजपा आकाश पोहाणे, हिंगणघाट ग्रामीण भाजपा तालुकाध्यक्ष विनोद विटाळे ,आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्ष शंकर आश्रम, भाजपा समुद्रपूर तालुका अध्यक्ष वामन चंदनखेडे, विधानसभा प्रमुख संजय डेहणे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश कामडी, कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटचे संचालक प्रफुल बाडे, खुशाल चले, सुमित ढगे इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.