नागपूर समाचार : नागपूर जिल्हातील पतसंस्थांची संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी विविधउपक्रम राबवीत असते. नागपूर जिल्हा संघ व महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 01,02, व 03 मार्च 2024 ला दुपारी 12.30 ते 03.30 या कालावधीत संत्रा नगरीतील सुप्रसिद्ध सभागृह कविवर्य सुरेश भट, रेशीम बाग, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
अनिवासी कार्यशाळा व पतसंस्था संचालक व कर्मचारी एकत्रिकरणासह भारतीय इतिहासात प्रथम संस्थांचे कारभारावर आधारित पतदर्शन’ हा लघु चित्रपटाची निर्मिती करण्यात आलेली असून सहकार चळवळीतील दिवंगत कार्यकर्ते स्व. वि.ना. देशपांडे, स्व. रविंद्र सातपुते व स्व. मधुकर येवले त्यांच्या स्मृतीला समर्पित करण्यात येत आहे. या प्रसंगी त्यांचे नातेवाईकांना सुद्धा निमंत्रित करण्यात आलेले आहे.
रविवार दि .03 मार्च 2024 रोजी केंद्रीय मंत्री मा. ना. नितीन गडकरी राज्याचे सहकार आयुक्त मा. सौरभ राव, आमदार कृष्णा खोपडे, ना ना सह बँकेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले किल्लोळ, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष व चळवळीचे शिरोमणी श्री. सहकार तज्ञ प्रा. जगदीश काकासाहेब कोयटे यांचे प्रमुख उपस्थितीत पतदर्शन’ या चित्रपटाचे लोकार्पण होत आहे.
तीन दिवशीय अनिवासी कार्यशाळेचे पहिल्या दिवसी दि. 01 मार्च 2024 रोजी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था श्री प्रवीण वानखेडे, विभागीय सहनिबंधक (लेखा) श्री. संजय बिरले, जिल्हा उपनिबंधक मा. गौतम वालदे, जिल्हा लेखापरीक्षक वर्ग -01, श्री सुधीर आत्राम, सहकार भारतीचे श्री. विवेक जुगादे यांचे प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. या तीन दिवसीय कार्यशाळेत पतसंस्था कारभारासंबंधी विविध विषयावर अभ्यासू व तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
नागपूर जिल्हातील पतसंस्थाचा कारभार हा पारदर्शक, सहकार कायद्याच्या चाकोरीत राहून पतसंस्थांची संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी अधिकाधिक पतसंस्था पदाधिकारी /संचालक / अधिकारी / कर्मचारी वर्गाने या तीन दिवशीय कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन नागपूर जिल्हा पतसंस्था संघांचे अध्यक्ष श्री राजेंद्र घाटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले.