नागपूर समाचार : जय विदर्भ पार्टीच्या वतीने आज दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ गुरुवारला महात्मा गांधी पुतळ्यासमोर, व्हेरायटी चौक, नागपूर येथे वादा निभाओ – विदर्भ राज बनाओ म्हणत नारे निदर्शने करण्यात आले. सत्तेत येण्यापूर्वी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी राज्यात व केंद्रात जर भाजपा सत्तेत आल्यास १०० दिवसाचे आत विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करू असे लिखित आश्वासन दिले होते. आश्वासन देऊन १० वर्षे लोटूनही आजपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणी बद्दल भाजपाचा एकही नेता संसदेमध्ये विदर्भाचा आवाज उचलून धरताना दिसला नाही. केंद्र सरकारने लोकसभा निवडणूक २०२४ पूर्वी विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करून २०१४ च्या दिलेल्या आश्वासनाची पुरती करावी अन्यथा विदर्भाची जनता भाजपा लां विदर्भातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. नारे निदर्शने दरम्यान “मोदिजी वादा निभाओ – विदर्भ राज बनाओ”, “वेगळा विदर्भ झालाच पाहिजे”, “लेके रहेंगे-लेके रहेंगे-विदर्भ राज लेके रहेंगे”, “अभी तो यह अंगडाई है-आगे घोर लढाई है”, “लढेंगे-जितेंगे”, “केंद्र शासन मुर्दाबाद…..मुर्दाबाद”, “भाजपा सरकार मुर्दाबाद….मुर्दाबाद”, “विदर्भ के गद्दारोको जुते मारो सालोको” असे आक्रमक नारे लावले व या सरकारची प्रतिकृती म्हणून बेशरमचे झाड दाखवून निषेध व्यक्त केला.
नारे निदर्शने करताना जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार पार्टी कार्यकर्यांा ना संबोधित करताना म्हणाले की, “मोदिजी काल यवतमाळ जिल्ह्याच्या दौर्यावर आले परंतु त्यांनी वैदर्भीय जनतेची सूद सुद्धा घेतली नाही, विदर्भात रोज ७ शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्यातही यवतमाळ हे आशीय खंडातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करणारा जिल्हा आहे हे असून सुद्धा यावर पंतप्रधान एकही शब्द बोलू नये हा वैदर्भीय जनतेचा, शहीद शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे. १०० दिवसाचे आत राज्य देण्याचे आश्वासन देऊनही आजही वैदर्भीय जनतेला स्वतंत्र विदर्भाच्या राज्याची मागणी करावी लागत आहे. मोदिजी आपल्या ग्यारंटीचा प्रचार करीत आहेत परंतु दिलेल्या आश्वासनांना विसरून नव्या आश्वासनाची खैरात मांडत आहेत. कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे व भाजपाला आता विदर्भातून हद्दपार करून वैदर्भीय जनतेच्या जय विदर्भ पार्टीला सत्तेत आणावे यासाठी एकही क्षण न गमावता पूरजोर प्रयत्न करावे.”
पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी बीजेपीला त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील १९९७ च्या भुबनेश्वर येथील ठरावाची आठवण करुन देत विदर्भाचे राज्य तत्काळ निर्माण करावे अन्यथा बिजेपीची कोंबडीसुद्धा विदर्भात अंडा देणार नाही अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू व “खोट्या आश्वासनाची सरकार…. नही बनेगी अबकी बार” असे बोलत बीजेपीच्या सर्व सभा उधळून काढा असे आवाहन केले.
यावेळी जय विदर्भ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण केदार, महासचिव विष्णू आष्टीकर, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर, सहसचिव गुलाबराव धांडे व अरविंद भोसले, नागपूर शहर कार्याध्यक्षा एड. मृणाल मोरे, सचिव नरेश निमजे, उपाध्यक्ष सुभेदार गुणवंत सोमकुवर व प्रदीप देशपांडे, कोषाध्यक्ष रमेश वरुडकर, शहर प्रवक्ता गणेश शर्मा, कार्यकारिणी सदस्य प्यारुभाई उर्फ नौशाद हुसैन, उत्तर नागपूर अध्यक्षा ज्योती खांडेकर, दक्षिण अध्यक्ष राजेंद्र सतई, दक्षिण पश्चिम अध्यक्ष अशोक पाटील, मध्य नागपूर अध्यक्ष रवींद्र भामोडे, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष अमूल साकुरे, डॉ. रामकृष्ण पौनीकर, सतीश शेंद्रे, अनिलकुमार केशरवाणी, किशोर कुर्वे, आशा वानखेडे, त्रिवेणी भोयर, सुहासिनी खडसे, एड. रेवाराम बेलेकर, श्याम लुटे, कांचन करांगळे, बेबी दुधकवळे, विजय मौदेकर, वासुदेव मासुरकर, उत्तम साळुंखे, भोजराज हाडके, बसंतकुमार चौरासिया, तारेश दुरुगकर, नागसेन मेश्राम, अरुणराव खंगार, पंकज साबळे, आनंद निखार, प्रशांत तागडे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.