नागपूर समाचार : वुमन ॲडव्हेंचर नेटवर्क ऑफ इंडिया (वाणी) या भारतभर महिलांच्या साहसी खेळांना प्रोत्साहन देणा-या संघटनेच्यावतीने रविवार, 3 मार्च 2024 रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे ‘वाणी समिट 2024’ चे आयोजन केले आहे.
दोन सत्रात होणा-या या संमेलनात सकाळी 9 वाजता इंडियन माउंटेनियरींग फाउंडेशनच्या फिल्म्स प्रदर्शन, पद्मश्री प्रेमलता अग्रवाल व रीना धरमसक्टू यांच्या संवाद आणि एव्हरेस्टर महिलांसोबत फायर साईड चॅटचे आयोजन करण्यात आले आहे.
दुपारी 2 वाजताच्या सत्रात पद्मश्री शीतल महाजन यांचे सादरीकरण तसेच, पाच वेळा गिनिज बुक रेकॉर्डच्या मानकरी अल्ट्रा रनर सोफिया सुफी व 17 वर्षाची कार रेसर आशी हंसपाल अनुभव कथन करेल. संमेलनाचा समारोप फायर साईड चॅटने होईल.
पद्मश्री अंशु जेन्सेम्पा, 83 वर्षीय पद्मश्री चंद्र प्रभा ऐतवाल यांच्यासह श्रीमती रीता गोम्बू मारवाह, के सरस्वती, बिमला नेगी देवस्कर, राधा देवी, सविता धपवाल, सुमन कुतियाल, हर्षा पनवार, सरला नेगी भौमिक, वसुमती, स्नेहा श्रीनिवासन, चेतना साहू, रीना, मेजर कृष्णा दुबे,सुषमा बिस्सा,अनिता वैद्य, एल.अन्नपूर्णा, पायो मुर्मू, शामला पद्मनाभन,गंगोत्री इंदुमती, नयना धाकड, भावना देहरिया, मनीषा वाघमारे, मनीषा धुर्वे, हेमलता गायकवाड, चंद्रकला गावित, पूनम शर्मा, शितल, सुफिया, आशी हंसपाल यांचाही सहभाग राहणार आहे.
2 मार्च रोजी कॉन्फिडन्स पार्क कॅम्पसाईट, वर्धा येथे या साहसी महिलांचे विविध कार्यक्रम होणार आहेत. नागपूर महानगरपालिका, केसीसी ग्रुप नागपूर, बीएनआय, इनोव्हेशन्स इव्हेंट्स आणि सोल्युशन्स, कॉन्फिडन्स पार्क कॅम्पसाईट यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक श्रीमती बिमला नेगी देऊस्कर, नीरजा पठानिया आणि भारती गोमासे यांनी केले आहे.