नागपुर समाचार : शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी स्वतःची ओळख करून देताना जितेंद्र नाव सांगताच, ‘बहोत अच्छे, आप यंग हो, सभी कार्यकर्ताओं को मेरा नमस्ते कहना’, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली. सरचिटणीस संदीप गवई यांनी थोड्या मोठ्या आवाजात नाव सांगितले. ‘गवई’ नाव कानावर येताच पंतप्रधानांनी हसून बघितले व प्रतिसाद दिला.
शहरातून प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, धर्मपाल मेश्राम, विष्णू चांगदे, अश्विनी जिचकार, युवा मोर्चाचे अध्यक्ष बादल राऊत, शक्ती केंद्रप्रमुख प्रशांत मानापुरे, बुथप्रमुख राहुल मेंढे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, डॉ. मिलिंद माने, राम आंबुलकर, विलास त्रिवेदी, बुथप्रमुख वैशाली फुलझेले, शिवनाथ पांडे, दक्षिणमधील वॉरिअर प्रदीप सोनुले, शक्ती केंद्रप्रमुख चंद्रकांत देशपांडे, ग्रामीणमधून रामटेक लोकसभा निवडणूकप्रमुख अरविंद गजभिये, डॉ. राजीव पोतदार, किशोर रेवतकर, आदर्श पटले, अॅड. प्रकाश टेकाडे, अजय बोढारे, अनुराधा अमीर, सुपर वॉरियर दिलीप ठाकरे, सावनेर मंडळ अध्यक्ष मंदार मंगळे तसेच, माजी आमदार सुधीर पारवे, मल्लिकार्जुन रेड्डी, संध्या गोतमारे, दिनेश ठाकरे, अविनाश खळतकर, किशोर चौधरी, बबलू गौतम यांच्यासह अन्य पदाधिकारी होते.